मद्यपान करून वाहन चालविणार्‍या दोघांना कारावास   

पुणे : मद्यपान करून वाहन चालविणार्‍या दोघांना मोटार वाहन न्यायालयाने साधा कारावासासह २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश  ए. सी. बिराजदार यांनी हा आदेश दिला. 
  
दत्तात्रय सतीश टिपरे (वय २६) आणि राम कुमार भारती (वय ४६) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी दोघांची नावे आहेत. टिपरे यास ४ दिवस आणि २० हजार रुपयांचा दंड, तर भारती यास ३ दिवसांच्या कारावासासह २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोघांनाही १० दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी मद्य पिऊन वाहन चालविताना वाहतूक पोलिसांना आढळून आले होते. त्यांची ब्रिथ नालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता त्यांनी नियमांपेक्षा जास्त मद्य प्राशन केले असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मोटार वाहन न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी सहाय्यक सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी मद्यपान करून वाहन चालविणार्‍या दोघांनाही कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने त्यांना साध्या कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. 

Related Articles